काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याच विरोधात एफआयआर

1000123749

नवी दिल्ली : हल्द्वानीच्या रामलीला मैदानावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर निर्माण झालेल्या ‘शुद्धीकरण’ वादाप्रकरणी आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याच विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या शुद्धीकरण कार्यक्रमात सहभागी झालेल्या अमित कुमार यांच्या तक्रारीवरून हल्द्वानी कोतवाली पोलिसांनी राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (CrPC) कलम 196, 299 आणि अनुसूचित जाती/जमाती कायद्याच्या कलम 3 (1)(q) अंतर्गत राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर क्रमांक 297/26 दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे दलित समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तक्रारदार अमित कुमार यांनी राहुल गांधी यांच्यावर आपल्या वक्तव्याने दलित समाजाचा आणि शुद्धीकरण कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचा अपमान केल्याचा आरोप केला होता.

यापूर्वी अमित कुमार आणि विनोद कुमार आर्य यांनी हल्द्वानी कोतवालीमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. 8 ऑगस्ट रोजी खर्गे यांच्या सभेनंतर रामलीला मैदानावर कथित शुद्धीकरण विधी करण्यात आला.काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 8 ऑगस्ट रोजी हल्द्वानीच्या रामलीला मैदानावर एक जाहीर सभा घेतली. या सभेनंतर, भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी जमिनीवर गंगाजल शिंपडून शुद्धीकरण केल्याने वाद निर्माण झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी या शुद्धीकरण विधीवर आपली मते व्यक्त केली. काँग्रेसने याला भाजपच्या मानसिकतेशी जोडून विरोध केला. राहुल गांधींनी या शुद्धीकरण विधीला दलित सन्मानाशी जोडून त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काँग्रेसने या प्रकरणी भाजप नेत्यांवर कारवाईची मागणी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top