मुंबई: मराठा आरक्षणासाठी तब्बल 11 व्यांदा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती घणाघाती प्रहार सुरू ठेवला आहे. गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटील हे शिंदे यांच्याच इशाऱ्यावर उपोषण करत आहेत, असा आरोप केला जात होता, मात्र आता थेट शिंदे यांच्याच विरोधात जरांगे पाटील यांनी मोर्चा उघडल्याने राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, शिंदे यांचा काल एकेरी उद्धार केल्यानंतर आज पुन्हा जरांगे पाटील यांनी शिंदे यांच्यावर हल्ला चढवला आहे.तर मराठे एकनाथ शिंदेंना संपवून टाकतीलसापडलेल्या 58 लाख नोंदींवरून मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे यांच्यावर सडकून प्रहार केला आहे. जर 58 लाख नोंदी सापडलेल्या नाहीत, तर एकनाथ शिंदेंनी स्पष्ट करावं किंवा देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं की अशा 58 लाख नोंदी सापडलेल्या नाहीत. तिकडे शिंदेंनी तरी सांगावं की मी फसवलेलं नाही, 58 लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे जर भाजपने अशा पद्धतीने नोंदी कमी केल्या तर मराठे एकनाथ शिंदेंना संपवून टाकतील. पक्षाशी ज्या पद्धतीने गद्दारी केली तशी आमच्याशी गद्दारी का केली? असे मराठे विचारतील, अशी खोचक टीका जरांगे पाटील यांनी केली. तर शिंदे साहेबांना पळायला सुद्धा जागा राहिली नसतीशिंदे यांच्या परभणी दौऱ्यावरून सुद्धा जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले की, शिंदे यांनी परभणी दौरा रद्दच केला होता; मात्र पुन्हा 10 मिनिटांनी कोणत्यातरी अधिकाऱ्याने ‘जरांगे पाटलांनी सूट दिली आहे’ असा मेसेज देताच त्यांनी परभणी दौरा केल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला. आम्ही जर भिडलो असतो तर शिंदे साहेबांना पळायला सुद्धा जागा राहिली नसती, असा सुद्धा दावा जरांगे यांनी केला.
….तर मराठे एकनाथ शिंदेंना संपवून टाकतील : मनोज जरांगे


