मुंबई: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून, सरकारच्या अधिकृत शिष्टमंडळाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. इकडे उपोषणाचा तिसरा दिवस उजाडला तरी सरकारकडून कोणतीही ठोस चर्चा झाली नसल्याने मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला मुंबई कूच करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मनोज जरांगे पाटील म्हणाले, “आम्ही मुंबईला जायची तयारी करतोय. मराठा समाजाला सांगतो 12 सप्टेंबरपर्यंत हळूहळू मुंबईला जा. आपल्या सोयीनुसार तिथे राहा, फक्त आझाद मैदानावर जाऊ नका. मराठे मुंबईत आलेले त्यांना कळले नाही पाहिजे. पाहुणे, मित्र यांच्याकडे राहा. पोलिसांनी तुम्हाला जर उचलून नेले तर बिनधास्त पोलीस स्टेशनला (Police Station) जा, उलट तिथे चांगली सोय होते. उपोषण सोडणार नाही, मी बरोबर मुंबईत जातो, अशी घोषणा त्यांनी केलीय. Manoj Jarange Patil: सरकारकडून कोणीही संपर्क साधलेला नाहीमनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, सगळे सोबत जाणे शक्य नाही. सरकारकडून कोणीही संपर्क साधलेला नाही. आमचे 12 तारखेला ठरल्यावर जाणार. गणेशोत्सव आपला आहे, आम्ही 11 दिवस गणपती बसवतो ते दीड दिवस बसवतात आणि ते आम्हाला देव-देव शिकवतात, आमच्या एवढं पुण्य कोण करतं,” असे देखील त्यांनी म्हटले. मंत्री उदय सामंत यांच्या संभाव्य दौऱ्यावर आणि सरकारच्या संपर्कावर प्रतिक्रिया देताना जरांगे पुढे म्हणाले, “24 तासात संपर्क साधू म्हणजे पावसासारखं आहे का, हळूहळू सरी पडणार. पोराहो आपले मुंबईचे सुरू करा,” असे त्यांनी म्हटले.
आम्ही मुंबईला जायची तयारी करतोय. मराठा समाजाला सांगतो, 12 सप्टेंबरपर्यंत हळूहळू मुंबईला जा.


